क्राईम

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}कामगारांना अडवून मोबाईल फोन व दुचाकी लुटण्याच्या प्रकारात सहभागी असलेल्या टोळीचा रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे १.५० लाख रुपये किमतीचे पाच मोबाईल फोन व एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
दि. १४ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कारेगाव येथील स्वामी समर्थ मंदिराजवळील परिसरात कामावरून घरी जाणाऱ्या कामगारांना अडवून धमकावत मोबाईल फोन हिसकावल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली.



