अपघातमहाराष्ट्र
Check Also
Close
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: आंधळगाव परिसरातील न्हावरा-चौफुला मार्गावर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात ऊसतोड कामगारांना घेऊन जाणाऱ्या महिंद्रा पिकअपला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण गंभीर व किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिंद्रा पिकअप (एमएच ४२ बीएफ ०६९९) या वाहनाच्या मागील हौद्यात ऊसतोड कामगार बसलेले असताना अशोक लेलंड कंपनीचा कंटेनर (एमएच १२ एनएक्स २९१९) भरधाव वेगात येऊन पिकअपला धडकला.
तसेच सीमा मोरे, देविका पाडवी, मुल्या माळी, साहिल माळी, काजल माळी, जुगरी पाडवी, इंदुबाई माळी, सुरेखा मोरे, नरेश मोरे, सोनेबाई पवार, दीपक पाडवी आणि सुरेश पाडवी हे जखमी झाले आहेत.
