
शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24 )मराठा आरक्षणाची लढाई निर्णायक ट्प्प्यात आली असून येत्या २९ ऑगस्टला मुंबई येथील आंदोलनात मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शिरुर येथे केले .
शिरुर क्रिटीकेअर हॉस्पिटलचे उदघाटन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या हस्ते झाले .यावेळी माजी नगरसेवक विठ्ठल पवार , आखिल भारतीय मराठा महासंघाचे संभाजीराव कर्डिले , श्यामकांत वर्पे , शोभना पाचंगे ,युवराज थोरात, नवनाथ फरगडे ,माजी सरपंच प्रकाश थोरात , तुषार दसगुडे , रुपेश घाडगे , रमेश दसगुडे आदी उपस्थित होते .
यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की मागील काही वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न धसास लावण्यासाठी संघर्ष करीत असून अनेकांना कुणबीचे दाखले मिळाले आहे. गरीब वर्गास सहकार्य करावे .
विकासा पासून मागे असणा-यांसाठी आरक्षण महत्वाचे आहे. .मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी माझे काम मी करतो . तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात सक्षमपणे काम करा. आरक्षणाची लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली असून . मुंबई येथे २९ ऑगस्टला पुन्हा आंदोलन करणार होणार असून मागील आंदोलनापेक्ष्या २० पटीहून आधिक लोक सहभागी होतील .
आरक्षणासाठी निर्णायक असणा-या २९ ऑगस्टचा मुंबई येथील आरक्षणाचा लढाईत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जरांगे यांनी केले .
डॉ . निखील अनभुले , डॉ .कृतिका अनभुले डॉ .अंकुर फलके , डॉ . आदर्श पांडेय , डॉ शुभम भुतकर व डॉ पूजा भूतकर यांनी एकत्रित येत शिरुर क्रिटीकेअर हॉस्पिटल सुरु केले आहे .
प्रास्ताविक डॉ . पूजा भूतकर यांनी केले .सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी तर आभार डॉ अंकुर फलके यांनी मानले .