विशेषशैक्षणिक

राजर्षी शाहू महाराजांना शब्दचित्रातून अनोखी आदरांजली डेक्कन स्कूलच्या सौ. रत्नमाला महाजन यांची कलाकृती

शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -24) –
डेक्कन स्कूल, शिरूर येथील कला शिक्षिका सौ. रत्नमाला महाजन यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त एक आगळीवेगळी आदरांजली वाहिली . त्यांनी शाहू महाराजांनी केलेल्या १५१ सामाजिक सुधारणांचे उल्लेख असलेल्या शब्दांद्वारे अत्यंत कल्पकतेने शाहू महाराजांचे चित्र साकारले.

ही कलाकृती कार्डबोर्ड आणि स्केच पेनचा वापर करून अवघ्या दोन दिवसांत तयार करण्यात आली. चित्र तयार करण्यापूर्वी सौ. महाजन यांनी शाहू महाराजांचे चरित्र सखोलपणे अभ्यासून १५१ सामाजिक कार्यांची यादी तयार केली.

राजर्षी शाहू महाराज हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पहिले अध्यक्ष होते. त्यांच्या स्मरणार्थ शाळेचे मुख्याध्यापक डॉ. समीर ओंकार यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या प्रसंगी क्रीडा शिक्षक श्री. चंद्रकांत झांजे यांनी विद्यार्थ्यांना शाहू महाराजांच्या कार्यावर माहिती दिली. सूत्रसंचालन श्री. सखाराम पुरी यांनी तर आभारप्रदर्शन शिक्षक प्रतिनिधी सौ. जयश्री दांडगे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री. अमोल वाघमारे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button