Uncategorized
शिरूर बसस्थानकात वृद्ध महिलेकडील ६७ हजार रुपयांचे सोन्याचे गंठण चोरीला अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम }
शहरातील बसस्थानक परिसरात दुपारच्या वेळेत एका वृद्ध महिलेकडील ६७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सौ. लता सुदाम जामदार (वय ६५, रा. कुंभारआळी, शिरूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ ते १२.३० या दरम्यान त्या शिरूर बसस्थानक परिसरात असताना

अज्ञात चोरट्याने त्यांच्या पिशवीची चैन उघडून आत ठेवलेले सोन्याचे गंठण चोरले. या गंठणाचे वजन दीड तोळे असून किंमत अंदाजे ६७ हजार ५०० रुपये एवढी आहे.


