राजकीयविशेष

शिरूर मधील जिल्हा परिषदेच्या ७ जागा करिता २० उमेदवार तर पंचायत समितीच्या १४ जागासाठी ४६ उमेदवार निवडणुक रिंगणात

शिरूर ( डेली न्यूज पोस्ट 24 )
अतिशय चुरशीने होत असलेल्या शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या ७ जागा करिता २० उमेदवार तर पंचायत समितीच्या १४ जागासाठी ४६ उमेदवार निवडणुक रिंगणात राहिले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या काही गट व गणात भाजप व राष्ट्रवादी अशी थेट लढत आहे. तर काही ठिकाणी दोन्ही शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी,अपक्ष अशी पंचरंगी लढत आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यारा प्रमुख उमदेवारा मध्ये शिरूर न्हावरा जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या { शिंदे } तृप्ती सरोदे यांनी आपला उमदेवारी अर्ज मागे घेतला आहे.भाजपाच्या शिक्रापूर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार कुसुम खैरे यांच्या सह जिल्हा परिषदच्या माजी सदस्या अपक्ष उमेदवार कुसुम मांढरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार माजी सभापती मोनिका हरगुडे यांची व अपक्ष अशी लढत आहे .मांडवगण फराटा जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते दादापाटील फराटे यांनी आपल्या उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. स्वाभिमानी विकास आघाडीच्या नावाने या गटात जिल्हा परिषस सह दोन्ही गणात उमेदवार उभे केल्याने या गटात भाजप राष्ट्रवादी व स्वाभिमानी विकास आघाडी व शिवसेना ठाकरे अशी चौरंगी लढत निश्चित झाली आहे.
दिवगंत माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या पत्नी शिरूर ग्रामीण जिल्हा परिषद गटातून भाजपाचा उमेदवार आहेत तर मांडवगण फराटा जिल्हा परिषद गटातून माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सभापती सुजाता अशोक पवार या राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवार आहेत तर माजी आमदार पोपटराव गावडे यांचे पुत्र राजेंद्र गावडे यांनी भाजप मध्ये प्रवेश करून टाकळी हाजी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी केली आहे.
साहजिकच पाचर्णे, पवार व गावडे या तीनही माजी आमदाराच्या कटुंबाची प्रतिष्ठा या निवडणुकीस पणाला लागली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती गट निहाय उमेदवार पुढील प्रमाणे –
तळेगाव – रांजणगाव सांड्स जिल्हा परिषद गट – रेखा मंगलदास बांदल ( राष्ट्रवादी काँग्रेस ) सारिका करपे (शिवसेना शिंदे ) दीपाली गव्हाणे ( भाजप ) रेश्मा जयेश शिंदे ( अपक्ष )
तळेगाव पंचायत समिती गण – शोभा महेश ढमढेरे ( राष्ट्रवादी काँग्रेस ) विद्या राजेंद्र भुजबळ ( भाजप ) चेतना ढमढेरे ( शिवसेना शिंदे )
रांजणगाव सांडस गण – विजय रणसिंग ( राष्ट्रवादी काँग्रेस ) राहुल रणदिवे ( शिवसेना शिंदे ) हनुमंत काळे ( भाजप ) राजेंद्र पवार ( अपक्ष )
शिक्रापूर सणसवाडी जिल्हा परिषद गट- मोनिका हरगुडे ( राष्ट्रवादी काँगेस ) सीमा कळमकर ( अपक्ष )
शिक्रापूर पंचायत समिती गण – रामभाऊ सासवडे ( राष्ट्रवादी काँग्रेस ), पंढरीनाथ गायकवाड ( भाजप ),
सणसवाडी पंचायत समिती गण – मनीषा संपत गव्हाणे ( राष्ट्रवादी काँग्रेस ) कोमल ढेरंगे( अपक्ष ) मीना ढेरंगे ( अपक्ष )
पाबळ केंदूर जिल्हा परिषद गट – प्रफुल्ल शिवले ( राष्ट्रवादी काँग्रेस ) विकास गायकवाड ( भाजप )
पाबळ पंचायत समिती गण – वंदना प्रकाश पवार( राष्ट्रवादी काँग्रेस) दीपक खैरे ( भाजप )
केंदूर पंचायत समिती गण – सुचेता रोहन थिटे ( राष्ट्रवादी काँग्रेस ) आशा साकोरे ( भाजप ) मनीषा भंवार ( बसपा )
टाकळी हाजी – कवठे यमाई जिल्हा परिषद गट- दामू धोंडिबा घोडे (राष्ट्रवादी काँग्रेस ) राजेंद्र गावडे, ( भाजप ) सुभाष पोकळे (शिवसेना शिंदे), बाळासाहेब डांगे ( शिवसेना ठाकरे )
टाकळी हाजी पंचायत समिती गण – संगीता दाभाडे ( राष्ट्रवादी काँग्रेस ), सुनिता कड (भाजप ) प्रगती निचित ( शिवसेना शिंदे ) पवित्रा शेलार ( शिवसेना ठाकरे )
कवठे येमाई पंचायत समिती गण – शिल्पा अतुल थोरात ( राष्ट्रवादी काँग्रेस ), माधुरी थोरात ( शिवसेना शिंदे ) जयश्री लंघे ( शिवसेना मशाल )कांचन सांडभोर ( भाजप )
रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गट – ज्योती मानसिंग पाचुंदकर ( राष्ट्रवादी काँग्रेस ) स्वाती पाचुंदकर (भाजप )
रांजणगाव पंचायत समिती गण – महेश फंड ( राष्ट्रवादी काँग्रेस ) सागर देवकर ( भाजप ) संदीप सोनवणे ( अपक्ष )
कारेगाव गण – निर्मला नवले ( राष्ट्रवादी काँग्रेस ) मनीषा पाचंगे ( भाजप ) अक्षय नाणेकर ( राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार )

पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याबद्दल डेली न्यूज पोस्ट टीम 24 च्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

शिरूर ग्रामीण जिल्हा परिषद गट – वृषाली बबन वाळके ( राष्ट्रवादी काँग्रेस )
मालतीताई बाबुराव पाचर्णे ( भाजप )
शिरूर पंचायत समिती गण – स्वाती घावटे ( राष्ट्रवादी काँग्रेस ) उज्ज्वला भोस ( भाजप )
न्हावरा पंचायत समिती गण – दीपक पवार ( राष्ट्रवादी काँग्रेस ) सागर खंडागळे ( भाजप )
मांडवगण फराटा जिल्हा परिषद गट – सुजाता अशोक पवार ( राष्ट्रवादी काँग्रेस ) मच्छिंद्र गदादे ( शिवसेना ठाकरे ), सचिन शेलार ( भाजप ), दादासाहेब फराटे ( अपक्ष )
मांडवगण फराटा पंचायत समिती गण – संगीता फराटे ( राष्ट्रवादी काँग्रेस )
शोभा वराळे ( भाजप ) स्वाती मचाले ( शिवसेना ठाकरे ) दीपाली नागवडे ( अपक्ष )
वडगाव रासाई पंचायत समिती गण – विकास शेलार (राष्ट्रवादी काँग्रेस ), पोपटराव शेलार ( शिवसेना ठाकरे ), माऊली पाटोळे ( भाजप ) रणजित पाडळे ( अपक्ष ), विजेंद्र गद्रे ( अपक्ष )
संतोष पटेकर ( अपक्ष ) नानासाहेब सोनवणे ( अपक्ष )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button