आरोग्य

किटकनाशक प्राशनामुळे ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}: तालुक्यातील न्हावरा येथील वडखलेवाडी परिसरातील ६० वर्षीय व्यक्तीचा किटकनाशक औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आनंदा म्हाता शेंडगे (वय ६०, रा. वडखलेवाडी, न्हावरा, ता. शिरूर, जि. पुणे) असे मृताचे नाव आहे.

याबाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अ.म.र. क्र. २१/२०२६ भा. ना. सु. सं. १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. भैरू आनंदा शेंडगे (रा. न्हावरा, ता. शिरूर) यांनी यासंदर्भात खबर दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदा शेंडगे यांनी ३१ जानेवारी २०२६ रोजी राहत्या घरी किटकनाशक औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पाबळ फाटा येथील चोरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये हलविण्यात आले होते. मात्र, ७ फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे ३.३५ वाजता उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची एमएलसी क्र. ०३/२०२६ व एमएलपीएम क्र. ६८७/२०२६ अशी नोंद असून संबंधित कागदपत्रे चतुश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर येथून टपालाद्वारे शिरूर पोलीस ठाण्यात प्राप्त झाली आहेत. त्यानुसार १० फेब्रुवारी रोजी रात्री १०.१५ वाजता मयत रजिस्टरमध्ये नोंद करण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) भोते करत आहेत. पोहवा/२४९९ टेंगले यांनी दाखल अंमलदार म्हणून काम पाहिले असून, प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button