Uncategorizedराष्ट्रीय

शिरुर येथे जर्मन भाषा प्रशिक्षणास सुरुवात

शिरूर( डेली न्यूज पोस्ट टीम ) येथील डेक्कन स्कूलमध्ये इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी जर्मन भाषेचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. जागतिक स्तरावर उपलब्ध असलेल्या संधींचा विचार करता मुलांना जर्मन भाषेचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळेच डेक्कन स्कूल मधील इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थी व शिक्षकांसाठी जर्मन भाषा मूलभूत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गरवारे महाविद्यालयातील जर्मन भाषेच्या विद्यार्थिनी समृद्धी संतोष शेळके या विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन डेक्कन स्कूलचे मुख्याध्यापक डॉ. समीर ओंकार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक श्री सखाराम पुरी यांनी जर्मन भाषा प्रशिक्षणाचे महत्त्व विशद केले तसेच जागतिक स्तरावर जर्मन भाषेचे असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

यावेळी डॉ.ओंकार यांच्या हस्ते समृद्धी शेळके यांचा सत्कार करण्यात आला . डेक्कन स्कूलमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्व विकास व जर्मन भाषा मूलभूत प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये सक्षमपणे उतरण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करणे हा या शिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे डॉ.ओंकार यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button