महाराष्ट्र
मराठी शाळेला सक्षम करण्यासाठी साहित्यिक कलवंतासह समाजातील सर्वानी एकत्रित येऊन मराठीचे दूत म्हणून काम करावे : राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे
मराठी शाळेला सक्षम करण्यासाठी साहित्यिक कलवंतासह समाजातील सर्वानी एकत्रित येऊन मराठीचे दूत म्हणून काम करावे : राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे
Related Articles
Check Also
Close

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24} घोड नदीवरील ‘म्हसे–अण्णापूर (प्रजिमा–१९८)’ या महत्त्वाच्या पुलाचे काम मंजुरीनंतर पाच वर्षांनंतरही अर्धवट व बंद अवस्थेत असल्याचे उघडकीस आले आहे. सन २०२१ मध्ये मंजूर झालेल्या या प्रकल्पासाठी ₹१०.२५ कोटींचा निधी उपलब्ध असताना, सन २०२३ मध्ये उद्घाटन करूनही प्रत्यक्षात काम ठप्प असल्याने सार्वजनिक निधीच्या अपव्ययाचा आरोप सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी केला आहे.
त्यांनी सांगितले पुलाचे की खांब व संरचना अर्धवट अवस्थेत असून, कामासाठी आणलेले लोखंडी स्टील साहित्य उघड्यावर पडून गंजलेले आढळत आहे. हे साहित्य भविष्यात वापरल्यास सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या देखरेखीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.