



याबाबत भाजपा नगरसेवक यांनी शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांना निवेदन दिले.यासंदर्भात माहिती देताना नगरसेवक संतोष थेऊरकर यांनी सांगितले की गेल्या पाच दिवसांत या परिसरात झालेल्या दोन अपघातांत तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
या पार्श्वभूमीवर वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी तसेच नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सदर डी.पी. रोड खुला करण्याची मागणी जोर धरत आहे.भाजप गटनेते नितीन पाचर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर रस्ता सुरू करण्यासाठी वन विभाग, म्हाडा तसेच संबंधित शासकीय विभागांकडून आवश्यक परवानग्या मिळविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. यासाठी भाजपच्या नगरसेवकांकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, असे
यावेळी स्पष्ट करण्यात आले.
आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. डी.पी. रोड वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत योग्य ते प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिल्याचे नगरसेवक संतोष थेऊरकर यांनी सांगितले.


